गुढी पूजन कसे करावे?

गुढी पूजन कसे करावे?

चैत्र शुद्ध ।।१।। (प्रतिपदा) म्हणजेच उद्याची १३ एप्रिल २०२१. ह्या दिवशी दाराला तोरणे लावून गुढ्या उभारून नाव वर्षाचे स्वागत केले जाते.
आपली कालगणना हजारो वर्ष पूर्वीची आहे तसेच ती आपल्याला पंचांगाच्या माध्यमातून कळते, म्हणून ह्यादिवशी प्रामुख्याने पंचांग पूजन केले जाते.

एका उंच काठीला रेशमाच्या खणाची घडी बांधतात. त्यावर गडू उपडा घालतात. कडूनिंबाची दहाळी व आंब्याची पाने त्यावर बांधतात. साखरेची गाठी व फुलांचा हार गुढीला चढवतात. घरासमोर उंच ठिकाणी गुढी उभारतात. त्याला हळदी , कुंकू , अक्षदा , धने , फुले वाहून पूजा करावी तसेच धूप दीप करून नैवेद्य दाखवावा. आणि येणारे वर्ष सुख – समृद्धी , आरोग्यदायी तसेच मंगलमय जावो अशी प्रार्थना केली करावी. ह्यालाच ब्रह्मध्वज असे म्हणतात.
ह्यावर्षी प्लव नावाचे सवंत्सर आहे.

मंत्र :
ब्रह्मध्वज नमस्तेस्तु सर्वाभीष्ट फलप्रद ।
प्राप्तेस्मिन वत्सरे नित्यं मदगृहे मंगलम कुरु ।।

अशा रीतीने ब्रह्मध्वजाची प्रार्थना करवी.

अर्थ:
इच्छा पूर्ण करणारा तसेच उत्तम फळ देणाऱ्या ब्रह्मध्वजास नमस्कार असो.
नवीन वर्षात माझ्या घरात मंगलमयता यावी.

ब्रह्मध्वज पूजन झाल्यानंतर पंचांग पूजन करावे, या दिवशी पंचांग श्रवण म्हणजेच वर्षफल श्रवण करतात. या पंचांग श्रवणाचे फळ असे सांगितले आहे.:-

“तिथेश्च श्रीकरं प्रोक्तं वारादायुष्यावर्धनम् |
नक्षत्राद्धरते पापं योगाद्रोगनिवारणम् ||
करणाच्चिन्तितं कार्यं पञ्चाङ्गफ़लमुत्तमम् |
एतेषां श्रवणान्नित्यं गङ्गास्नानंफलं लभेत्||”

अर्थ – तिथीच्या श्रवणाने लक्ष्मी लाभते.वाराच्या श्रवणाने आयुष्य वाढते. नक्षत्र श्रवणाने पापनाश होतो. योगश्रवणाने रोग जातो. करणश्रवणाने चिंतिलेले कार्य साधते. असे हे पंचांग श्रवणाचे उत्तमफल आहे. त्याच्या नित्य श्रवणाने गंगास्नानाचे फल मिळते.

गोडाचा नैवेद्य दाखवून भोजन करावे. सूर्यास्ता वेळी गुढी उतरवून ठेवावी.
हिंदू नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

।।शुभं भवतु ।।