सोमप्रदोष – कार्यसिद्धी व इच्छापूर्ती करणारे व्रत

श्रीशंकर पार्वतीची प्रत्येक प्रदोषा दिवशी पूजा केली जाते. सर्वसाधारणपणे त्रयोदशी तिथीला प्रदोष असतो. सोमवारी येणार्‍या प्रदोषास सोम प्रदोष म्हणतात. सोमप्रदोषाचे व्रत अधिक शुभ आणि महत्त्वपूर्ण मानले जाते. या दिवशी दिवसभरात कधीही, विशेषकरून सायंकाळी श्री महादेवाची पुजा केली जाते. आपल्या धर्मात महत्वपुर्ण मानल्या गेलेल्या श्रीगुरुचरित्र या ग्रंथात सोमप्रदोषाचे महत्व सांगितले आहे. याचबरोबर शिवपुराण तसेच श्रीशिवलिलामृत या ग्रंथातही सोमप्रदोषाचे महत्व सांगितले आहे.

👉🏻 सोमप्रदोष का करावा ?
वरील ग्रंथातील अनेक उल्लेखानुसार मनातील अनेक वर्षांपासूनची इच्छा पुर्ण होण्यासाठी, तसेच कार्यसिद्धी होण्यासाठी सोमप्रदोषाचे व्रत केले जाते. गुरुचरित्र ग्रंथातील उल्लेखानुसार प्राणसंकट टळण्यासाठी सोमप्रदोषाचे व्रत केले जाते.

🕉️ सोमप्रदोषाचा पूजा विधी :
ह्या दिवशी उपवास केला जातो. कोणत्याही मंदिरातील अथवा आपल्या घरामधील देवघरात असलेल्या शिवलिंगाची पुजा केली जाते. आपण ज्यासाठी प्रदोषाची पुजा करणार आहोत तो संकल्प आपल्या गुरुजींकडुन यथासांग सोडावा. त्यानंतर महादेवाच्या पिंडीस पाणी, पंचामृत, उष्णोदक इ. ने स्नान घालावे. त्यानंतर रुद्राच्या आवर्तनाने अभिषेक करावा. यानंतर देवास हळद कुंकू अक्षदा, अत्तर, बेल फुले वाहून धूप दीप करावे. यादिवशी शक्य झाल्यास १०८ बेलपत्र वहावे त्यावेळी ‘ॐ नम: शिवाय’ या मंत्राचे पठण करावे. शिवपंचाक्षर स्तोत्र, शिवस्तूती, शिवलीलामृत यापैकी जे शक्य असेल त्या स्तोत्राचे अथवा ग्रंथाचे वाचन करावे. आपल्या मनातील इच्छा बोलुन श्रीमहादेवास दही भाताचा नैवेद्य दाखवून आरती करावी. हे व्रत ११ च्या प्रमाणात म्हणजे किमान ११ प्रदोष किंवा ११ वर्षे केले जाते. अनेक लोकांना या व्रताचे निश्चित फळ प्राप्त झाले आहे.

🛕कोणते प्रदोषव्रत कशासाठी ??

सोमप्रदोष- इच्छापुर्ती, कार्यसिद्धी, प्राणसंकटापासुन रक्षण.

भौमप्रदोष- अर्थिक संकटापासुन रक्षण, ऋणातुन मुक्ती, अर्थिक स्थैर्य

शनिप्रदोष- संततीप्राप्ती.

पक्षप्रदोष (वरील तिन्हीसह इतर वारी येणारा) – सर्वप्रकारची ऐहिक सुखे मिळावीत यासाठी.
=======🕉️======

🙏🏻शिव पंचाक्षर स्तोत्र🙏🏻

नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय
भस्माङ्गरागाय महेश्वराय ।
नित्याय शुद्धाय दिगम्बराय
तस्मै नकाराय नमः शिवाय

मन्दाकिनी सलिल चन्दन चर्चिताय
नन्दीश्वर प्रमथनाथ महेश्वराय ।
मन्दारपुष्प बहुपुष्प सुपूजिताय
तस्मै मकाराय नमः शिवाय

शिवायगौरी वदनाब्जबृंदा
सूर्याय दक्षाध्वर नाशकाय ।
श्रीनीलकण्ठाय वृषध्वजाय
तस्मै शिकाराय नमः शिवाय

वशिष्ठकुम्भोद्भव गौतमाय
मूनीन्द्र देवार्चिता शेखराय ।
चन्द्रार्क वैश्वानर लोचनाय
तस्मै वकाराय नमः शिवाय

यज्ञस्वरूपाय जटाधराय
पिनाकहस्ताय सनातनाय ।
दिव्याय देवाय दिगम्बराय
तस्मै यकाराय नमः शिवाय

पञ्चाक्षरमिदं पुण्यं यः पठेच्छिवसंनिधौ ।
शिवलोकमावाप्नोति शिवेन सह मोदते🙏🏻

👉🏻प्रसन्न पुजेची अनुभूती,
हमी शास्त्रोक्त पुजा विधींची..
पुजा बूक करण्यासाठी आमची वेबसाईट
www.gurujiondemand.com
संपर्क – ९१३०६००४२९/ ७३१८५७७७७२
अधिक माहितीसाठी आमचे Mobile App डाऊनलोड करा!