नवरात्रात प्रत्येक वारी कोणते नैवेद्य देवीस दाखवावे ?

नवरात्रात सप्तशतीपठणाचे विशेष महत्व आहे. सप्तशतीच्या मंत्रातील एक एक अक्षर म्हणजे अग्नीसमान आहे. मार्कंडेय पुराणात देवी असे म्हणते की जो मनुष्य माझे माहात्म्य श्रवण करील त्या मनुष्याच्या सर्व पीडा मी हरण करीन.
दुःस्वप्न- उग्र अशा ग्रहपीडा प्राप्त असता सप्तशती पाठ केल्याने त्या दूर होतील असे देवी माहात्म्य सांगते.
*राहुकाळात सप्तशती पाठाचे विशेष महत्व सांगितले आहे. तसेच विविध इच्छापूर्ती साठी सप्तशती पाठ केले जातात.
अश्विन महिन्यातील अष्टमीस देवीची अनेक प्रकारे उपासना केली जाते. तसेच त्या दिवशी मध्यरात्री भद्रकालीची उत्पत्ती म्हणून या तिथीस महाअष्टमी म्हणतात.

नवरात्रात प्रत्येक वारी कोणते नैवेद्य देवीस दाखवावे ते देवी भागवतात सांगितले आहे ते पुढीलप्रमाणे:-
रविवारी -पायस(खीर)
सोमवारी -गायीचे तूप
मंगळवारी -केळी
बुधवारी – लोणी
गुरुवारी -खडीसाखर
शुक्रवारी – साखर
शनिवारी -गायीचे तूप.

नवरात्रात प्रामुख्याने दुर्गास्तोत्र /महालक्ष्मी अष्टक/ कनकधारा स्तोत्र /रामरक्षा/ देव्यपराध स्तोत्र /श्रीसूक्त/शुलिनीदुर्गा सुमुखी स्तोत्र इत्यादी स्तोत्रांचे यथाशक्ती पठन करावे.
तसेच जमल्यास पुढील नियम पालन करण्याचा प्रयत्न करावा.
१)सात्विक अन्नाचे सेवन (शक्यतो परान्न वर्ज्य करावे)
२) ब्रम्हचर्य पालन
३) दाढी व कटिंग करू नये
४) गादीवर, पलंगावर न झोपणे.